Tue. Aug 3rd, 2021

अमरावती पंचायत समिती निवडणूक, मतदानाला सुरुवात

अमरावती : अमरावतीतील ३ पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे आणि तिवसा या 3 पंचायत समितींसाठी हे मतदान होत आहे.

तीनही तालुक्यांमधून ७६ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळपासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.

दिव्यांगांसोबतच मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केलेली आहे. मतदानप्रक्रिया सकाळी 7.30 ते 5.30 दरम्यान पार पडणार आहे.

मतमोजणीला उद्या म्हणजेच 9 डिसेंबरला सकाळी 10 वाजेपासून सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *