Tue. May 17th, 2022

अमरावती युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांशी संघर्ष

अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसोबत संघर्ष पाहण्यास मिळाला. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला असून युवा स्वाभिमानच्या तीन नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आले.

शिवाजी महाराज यांचा पुतळा महापालिका आयुक्तांनी हातावळ्याचे निमित्त करत युवा स्वाभिमानच्या तीन नगरसेवकांनी अमरावतीच्या महानगर पालिकेच्याविरोधात मोर्चा काढला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. पुतळा हटवणाऱ्या पोलिसांचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी पोलिसांवर बांगड्या फेकल्या. त्यामुळे परिस्थिती चिघळली आणि पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

राणा दाम्पत्य नजरकैदेतून मुक्त

आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विनापरवानगी पुतळा उभारल्यानंतर अमरावतीमध्ये राजकारण तापले होते. प्रशासनाने रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. मात्र, आता त्यांच्या घराजवळ कोणत्याही प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त नसल्याने रविवारी उशीरा त्यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.