Fri. Nov 15th, 2019

जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती बैलगाडी चालवतात….

अमृता फडणवीसांना आपण नेहमीचं वेगवेगळ्या अंदाजात पाहिलं आहे.

कधी त्यांची क्रुझवरील सेल्फीची क्लिक पाहिली तर कधी त्यांचे गाणे ऐकायला मिळाले.

त्यांच्या सामाजिक कामाचे दर्शनसुध्दा आपल्याला झाले आहे.

अमृता फडणवीस भोसरीमध्ये चक्क बैलगाडी चालवताना पाहायला मिळाल्या.

भोसरीतील इंद्रायणी थडी जत्रेस अमृता फडणवीस  यांची उपस्थिती

भोसरीमधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर शिवांजली महिला बचत गटाच्या वतीने भोसरीतील गायजत्रा मैदानावर इंद्रायणी थडी जत्रेस फडणवीस यांची उपस्थिती होती.

यावेळी फुलांनी सजवलेल्या, शिंगाना गुलाबी रंगांचे गोंडे बांधलेल्या, ऐटदार खिल्लारी जोडी असलेल्या बैलगाडीतून, ढोल ताशांच्या गजरात अमृता फडणवीस यांना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले.

त्यांनी बैलगाडा चालविण्याचा आनंद लुटला. केशरी रंगाचा हिरवा तुरा असलेला फेटा फडणवीस यांना बांधण्यात आला होता.

यावेळी खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरच्या बास्केटबॉलच्या राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा ५१००० रुपयांचा धनादेश देऊन खास सत्कार करण्यात आला.

यावेळी फडणवीस म्हणाल्या, जत्रेमुळे महिलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळणार आहे.

आपण आता मोठा विचार करायला हवा. चांगले कौशल्य आत्मसात केले तर त्याला नक्कीच चांगली बाजारपेठ मिळेल.

तुमच्या मनात प्रबळ इच्छा असेल तर यशाचे शिखर नक्की गाठता येईल. स्त्री ही अबला नसून सबला आहे.

याठिकाणी संयोजक आमदार महेश लांडगे, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, पूजा लांडगे आदी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *