Mon. Jan 17th, 2022

अभिनेत्री अमृता रावने दिला एका गोंडस मुलाला जन्म

अमृता आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम…

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अमृता रावने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अमृताची आणि बाळाची प्रकृती चांगली असल्याचं म्हटलं जात आहे. अमृता आणि तिचा पती आरजे अनमोल पहिल्यांदाच आई-बाबा झाले आहे. त्यांची ही आनंदाची बातमी अमृता-अनमोलच्या टीमने शेअर केली आहे तर रविवारी सकाळी अमृताने बाळाला जन्म दिला.

अमृता आणि अनमोलने २०१६ मध्ये लग्न केलं. त्यापूर्वी जवळपास ७ वर्ष ते एकमेकांना डेट केलं होतं. सध्या अमृता चित्रपट फार कमी दिसते. मात्र ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
अमृताने २००२ मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं.

अमृताचा पहिला चित्रपट हा ‘इश्क-विश्क’, होता मात्र तिला खरी प्रसिद्धी ही ‘विवाह’  चित्रपटापासून मिळाली. या दोन्ही चित्रपटात अमृताने शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती.  अमृताने अनेक चित्रपटात काम केलं आहे तर तिचा ‘मैं हूँ ना’, हा चित्रपट फार गाजला होता  तिने ‘मस्ती’, ‘शौर्य’  ‘सत्याग्रह’, ‘वाह लाइफ हो तो एैसी’, यासारख्या अनेक चित्रपटात काम केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *