Mon. Jul 22nd, 2019

अमरनाथ यात्रेवरील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, 7 भाविक ठार

0Shares

वृत्तसंस्था, जम्मू-काश्मीर

 

काश्मिरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेतल्या भाविकांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात 7 भाविक ठार झालेत.

 

गुजरातमधल्या वलसाडच्या 5 तर महाराष्ट्रातल्या पालघरमधल्या 2 भाविकांचा यात मृत्यू झाला आहे.

 

अनंतनागमधल्या बेंटेगू आणि खानबल परिसरामध्ये दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. हल्ला झालेली ही बस गुजरातमधल्या वलसाडची आहे.

 

दहशतवाद्यांनी बसवर बेछुट गोळीबार केला. त्यात दोन भाविक जागीच ठार झाले. तर रुग्णालयात नेताना इतर गंभीर जखमींचा मृत्यू झाला.

 

CRPF च्या 40 आणि 90 या दोन बटालियन घटनास्थळी रवाना करण्यात आल्यात. जम्मू श्रीनगर महामार्गावर सुरक्षाही वाढवण्यात आलीय. 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: