Wed. Jun 19th, 2019

अमूल दुधाच्या किंमतीत 21 मे पासून वाढ

0Shares

मंगळवार 21 मे पासून अमूल दुधाच्या किंमतीत वाढ होणार आहे. अशी घोषणा अमूलच्या कार्यकारी संचालकांनी केली आहे. अमूल दुधाच्या किंमतीत दोन रुपयांनी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.अमूल टोंड मिल्क 500 मि.ली. म्हणजेच अर्धा लिटर दुध 21 रुपयात ग्राहकांना मिळत होते. आता त्यात एक रुपयांनी वाढ होवून 22 रुपयांना हे दुध मिळणार आहे. तर अमूलचे फूल 500 मि.ल क्रिम 27 रुपयांना मिळत होते ते आता 28 रुपयांना मिळणार आहे.

अमूलचा किंमतीत वाढ

अमूल डेअरीने दूधाचे दर वाढवले असून  म्हशीच्या 1 लीटर दूधात 10 रुपयांनी वाढ केली होती.

तसेच 1 लीटर दुधात 4.5 रुपयांनी वाढ केली होती. असे दर वाढवण्यात आले होते.

दुधांच्या दरात वाढ झाल्यामुळे याचा फायदा त्या पशु पालकांना झाला होता.

11 मे पासून हा फायदा त्यांना देण्यात येत असल्याचही सांगण्यात येत आहे.

मिल्क मार्केटींग फेडरेशन (जीसीएमएमएफ) ही अमूलच्या उत्पादनाचं काम करते.

अमूलचे दुधाचे दर लीटर पाठीमागे 2 रुपयांनी वाढ होणार आहे.

21 मंगळवार पासून या नविन दराप्रमाणे ग्राहकांनी दुध मिळणार आहे.

सध्या बाजारात अमूल दुधाला ग्राहकांनी चांगली पसंती मिळत आहे.

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: