Thu. Jan 27th, 2022

भाजपच्या ‘या’ खासदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

भाजपच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोलापूर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहे .

खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

जयसिद्धेश्वर स्वामी हे सोलापुरचे खासदार आहेत. यांच्याविरोधात अक्कलकोट तहसिलदारांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.

या दाखल केलेल्या फिर्यादीवर बुधवारी सोलापूर न्यायालयात सुनावणी करण्यात आली.

जात पडताळणी समितीच्या आदेशानव्ये तहसीलदारांनी ही फिर्याद दिली होती .

यानुसार सोलापूर न्यायालयाने खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

कोर्टाने 156 / 3 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सोलापुरातील जात पडताळणी समितीने खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवले होते.

या निर्णयाला स्थगिती मिळावी अशी याचिका महास्वामी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली . त्यावर 13 मार्चला सुनावणी होणार आहे.

जयसिद्धेश्वर स्वामी महाराजांनी लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र दिले होते. ते जात प्रमाणपत्र बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *