Fri. Sep 30th, 2022

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाच्या चरणी ३५ किलो सोनं दान

मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक चरणी तब्बल ३५ किलो सोनं दान करण्यात आलं आहे. दान करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ही १४ कोटी इतकी आहे.

परंतु सोनं दान केलेल्या भक्तांच नाव सांगण्यास मंदित समितीच्या वतीने नकार दिला आहे.

विशेष म्हणजे सिद्धिविनायक मंदिराच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं दान केल्याची पहिलीच घटना आहे. याबाबतची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकरांनी दिली.

नवस पूर्ण झालेल्या एका भाविकाने विघ्नहर्त्याच्या चरणी 35 किलो सोनं दान केलं आहे.

निनावी भक्ताने दिलेल्या सोन्याच्या दानातून मंदिराचा घुमट, गाभारा आणि दरवाजा यागोष्टींना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.

Image

दरम्यान काही दिवसांपूर्वी शेंदूर लेपणासाठी आणि घुमट सोन्याने मढवण्यासाठी १९ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आले होते.

Image

सोमवारपासून मंदिर खुले करण्यात आले आहे.

तसेच १४ कोटी इतक्या किमतीचं सोनं दान करण्यात आले आहे.

त्यामुळे सिद्धिविनायक मंदिराचा समावेश लवकरच देशातील श्रीमंत मंदिरात होणार आहे. अशी माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.