Sat. May 25th, 2019

अर्थसंकल्पावर अण्णांची नाराजी, दिल्लीत आंदोलनाचा ईशारा

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

सरकारचे अर्थसंकल्प सादर झाल्यावर अनेकांकडून आपली मते मांडली जात होती. सत्ताधाऱ्यांमधे काही समर्थन करताना दिसतायेत, तर विरोधक टीका करत्यांमध्ये सामिल आहेत. मात्र, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा पुढे करत या अर्थसंकल्पावरुन विरोधकांच्या भूमिकेत येऊन सरकारवर टिका केली आहे.

अण्णा हजारे यांनी आरोप केला आहे की, हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा आहे. आजवर लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे सर्वांना शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा होती. मात्र, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीच तरतूद नाही, असं अण्णा म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि खासदार जास्त कष्ट करत असल्याने त्यांच्या पगारात घसघशीत वाढ केल्याचा टोमणा अण्णांनी मारला. कष्टकरी शेतकऱ्यांना पेन्शन जाहीर करणं अपेक्षित असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे. मात्र, सरकार शेतकरी विरोधी आणि उद्योगपती धार्जिणं असल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याचं अण्णा म्हणाले.

शेतकऱ्यांच्या हातात चावी असून येत्या काळात शेतकरीच सरकारला शिकवतील. शेतमालाचे दर, स्वामीनाथन आयोगावर काहीच केलं नाही. या अर्थसंकल्पात भुरळ घालणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या तरतुदी आहेत. या विरोधात शेतकर्‍यांत जनजागृती करुन 23 मार्चला दिल्लीत आंदोलन करुन निषेध करण्याचा ईशारा अण्णांनी दिला. या माध्यमातून सरकारच्या अधोगतीची वेळ आल्याचंही अण्णांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *