Mon. Jul 22nd, 2019

आनंदराज आंबेडकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त खोटं

0Shares

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र आनंदराज आंबेडकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याची माहिती जय महाराष्ट्रच्या सूत्रांनी दिली आहे. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्याचे ट्विट दिल्ली कॉंग्रेसने केले होते. मात्र हे ट्विट दिल्ली कॉंग्रेसच्या पेजवरून डिलीट केल्याचे समजते आहे. मात्र आनंदराज आंबेडकर यांची प्रतिक्रिया अद्याप मिळाली नसून या चर्चेला उधाण आले आहे.

आनंदराज आंबेडकरांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त खोटं –

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

यामध्ये आनंदराज आंबेडकरांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

तसेच दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघातले उमेदवार मागे घेत असल्याची घोषणा केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न कॉंग्रेस पक्षच पूर्ण करू शकतो, असे आनंदराज आंबेडकरांनी म्हटलं आहे.

दिल्ली कॉंग्रेसने आनंदराज आंबेडकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे ट्विट पोस्ट केले होते.

मात्र दिल्ली कॉंग्रेसने ते ट्विट डिलीट केले आहे.

नेमकं खरं वृत्त काय ?

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला नाही.

मात्र आनंदराज आंबेडकर यांची प्रतिक्रिया अद्याप मिळाली नसल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

त्यामुळे कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती आणि बातमी खोटी असल्याचे जय महाराष्ट्राच्या सूत्रांनी सांगितले आहे.

 

 

 

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: