Tue. Oct 26th, 2021

वंचितमधून आनंदराज आंबेडकर बाहेर

वंचित आघाडीला मोठा धक्का लागला आहे. आनंदराज आंबेडकरांनी वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नामविस्तार दिनानिमित्ताने आनंदराज आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी वंचितमधून बाहेर पडण्याची घोषणा केली.

का दिला राजीनामा ?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका 2019 साली पार पडल्या. या दोन्ही निवडणुकांमध्ये वंचितला अपेक्षित असं यश मिळालं नाही.

या अपयशामुळं आंबेडकरी समाजामध्ये नैराश्य असल्याचं आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं. आनंदराज आंबेडकरांनी आपली भूमिका औरंगादमध्ये मांडली.

ओबीसी नेत्यांसोबत ओबीसीचे मते वंचितला मिळाली का ? असा सवाल उपस्थित करीत वंचितमधून बाहेर पडल्याचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये जाहिर केले आहे.

यापुढे राज्यांमध्ये रिपब्लिकन सेना वाढवून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन संघटनेची नव्याने बांधणी करणार, असं आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं.

तसेच आगामी औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत संघटनेकडून उमेदवारी देणार असल्याचं, आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

दरम्यान एमआयएम नंतर आनंद आंबेडकर वंचितमधून बाहेर पडल्याने वंचितसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *