Thu. Aug 22nd, 2019

जम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

0Shares

वृत्तसंस्था, अनंतनाग

 

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चमकम झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

 

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर त्यांनी परिसराला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली.

 

दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं.

 

दरम्यान, गुरुवारीदेखील जम्मू काश्मीरमधील शोपियान आणि कुलगाम येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मेहबुब्बा मुफ्ती, उपमुख्यमंत्री एन. सिंग, जे. सिंधू, तसेच जीओसी 15 कॉप्स यांनी शॉपियन चकमकीत शहीद झालेल्या जवानांना सलामी दिली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *