Wed. Jan 19th, 2022

… आणि तुमच्यामुळे नागरिकत्व मिळालं – अदनान सामी

भाजपा नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात वयाच्या 67 वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे सर्वत्र दुखा:चे वातावरण पसरले आहे. राजकीय नेत्यांसह अनेक दिग्गज कलाकारांनी दुख: व्यक्त केले आहे. गायक अदनान सामीने ट्विट करत दुख: व्यक्त केले आहे. माझ्यासाठी ही धक्कादायक बातमी असून मला विश्वास बसत नसल्याचे ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे.

काय म्हणाले अदनान सामी ?

सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे सर्वत्र दुख: पसरले आहे.

सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी मिळताच अदनान सामी यांना मोठा धक्का बसला.

एक सन्माननीय, ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व होत्या असेही अदनान सामी यांनी म्हटलं आहे.

तुम्ही माझ्यासाठी आई सारखे असून अतिशय प्रेमळ आणि दयाळू होत्या.

तुम्ही नेहमी आमच्या स्मरणात रहाल असे ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अदनान सामी मूळचे पाकिस्तानी असून 2015 साली नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज दाखल केला.

सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना 2016 मध्ये भारतीय नागरिकत्व देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *