आंध्र प्रदेशातील सरकारी रुग्णालयात १५ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील सरकारी रुग्णालयात शनिवारी १५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्यामुळे या कोरोना रुग्णांचा जीव गेल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालय प्रशासनाने या आरोपांचे खंडन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयाचा दौरा केल्यानंतर अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

अनंतपूर येथील सरकारी रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा केला. आमच्या टीमने ऑक्सिजन प्लांटची तपासणी केली आहे. आम्ही प्रत्येक वार्डचा दौरा केला. सर्व ऑक्सिजन पुरवठा योग्य रितीने सुरू आहे. ऑक्सिजन प्लांटचे प्रेशर योग्य आहे, असे जिल्हाधिकारी निशांत कुमार यांनी सांगितले.

आज झालेल्या मृत्यूंचा ऑक्सिजनशी काही संबध नाही. रुग्णालयात १५ मृत्यू झाले आहेत. त्यांचे वय जास्त होते आणि काहींना सहव्याधी होत्या. आम्ही व्यक्तीशः तपासले आहे की, हे मृत्यू ऑक्सिजनमुळे झालेले नाही,असं प्रशासनानं म्हटलं आहे.

 

 

Exit mobile version