Sun. Jun 20th, 2021

आंध्र प्रदेशमध्ये ऑक्सिजनविना २२ रुग्णांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील एका रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे देश पुन्हा हादरला आहे. आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती येथील रुईया रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने तब्बल २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. दरम्यान अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ऑक्सिजन पुरवठा थांबताच राखीव ठेवण्यात आलेले ऑक्सिजन सिलेंडर लावण्याचा प्रयत्न झाला. त्या पाच मिनिटात श्वास घेता न आल्यानं व्हेंटिलेटरवर असलेल्या अकरा रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान श्रीपेरांबदुर येथून ऑक्सिजनचा टॅंकर मागवण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *