Sun. Sep 19th, 2021

आंध्र पोलिसांनी राम गोपाल वर्मा यांना ‘या’ कारणामुळे घेतले ताब्यात

सिनेमा निर्मितीपासूनच वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेल्या ‘लक्ष्मीज् एनटीआर’ या सिनेमाला आंध्रप्रदेश राज्यामध्ये बंदी करण्यात आली आहे. ‘लक्ष्मीज् एनटीआर’ हा सिनेमा प्रसिद्ध  दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. अभिनेते, तेलुगू देसम पार्टीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री अशा नानावधि क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे एनटीआर यांच्या विरोधी बाजू मांडणारा हा चित्रपट असल्याने या राज्यामध्ये  सिनेमाच्या प्रदर्शनाला जोरदार विरोध करण्यात येत होता.

हा सिनेमा 1मे रोजी आंध्रप्रदेश राज्यामध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र या राज्यामध्ये सिनेमावरून प्रचंड गदारोळ माजलेला आहे. वर्मा यांना या सिनेमा संबंधी घेण्यात येणाऱ्या प्रेस कॉन्फरन्सला पोलिसंकडून परवानगी देण्यात आली नव्हती, तरीही वर्मा हे प्रेस कॉन्फरन्ससाठी आग्रही होते. याप्रकरणी आंध्रप्रदेशच्या विजयवाडा पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेतलं होतं आणि वर्मा यांना हैद्राबादला जाण्याची सक्तीने पाठवण्यात आले.

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध राम गोपाल वर्मा यांनी ‘लक्ष्मीज् एनटीआर’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

तेलुगु देशम पार्टी (टीडीपी) चे एनटीआर यांच्यावर आत्तापर्यंत दोन सिनेमे येऊन गेले आहेत.

मात्र प्रसिद्ध राम गोपाल वर्मा यांनी एनटीआर यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणारा आणि त्यांच्या लक्ष्मी पार्वती यांच्याशी झालेल्या दुसऱ्या लग्नाला मध्यभागी ठेऊन हा सिनेमा तयार करण्यात आल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध आहे.

आंध्रप्रदेशमध्ये हा सिनेमा 1 मे रोजी प्रदर्शित होणार होता.

या सिनेमाला होणाऱ्या विरोधासंबंधी वर्मा हे विजयवाड्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार होते. यासाठी पोलिसांनी वर्मा यांना परवानगी दिली नव्हती.

तरीही राम गोपाल वर्मा आणि निर्माते राकेश रेड्डी पत्रकार परिषदेसाठी पाइलपुला रोडवर पोहोचले त्यासाठी पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि हैद्राबादला जाण्याची सक्तीने पाठवण्यात आले आहे.

राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सध्या चाललेया निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहितेचे पालन करण्यायाठी दोघांना ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, या दरम्यान पोलिसांकडून आलेल्या वाईट वागणुकीमुळे वर्मा हे नाराज आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *