Thu. Sep 16th, 2021

अँजिओप्लास्टीसारख्या हृदरोग उपचारात सेकन्डहँड माल वापरला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई


अँजिओप्लास्टीसारख्या हृदरोग उपचारातही सेकन्डहँड माल वापरला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीत ही बाब उघड झाली.  यासंबधी एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे काही तक्रारी आल्या होत्या.

 

त्यानुसार गेला काही दिवसांपासून खासगी रुग्णालयांमध्ये पथके पाठवून तपासणी केली असता ही माहिती समोर आली.

 

या गंभीर प्रकाराची दखल घेऊन आता राज्यभरात सर्वच रुग्णालयांमध्ये याप्रकरणी तपास करण्यात येणार आहे.

 

अशा प्रकारे होतोय अँजिओप्लास्टीत ‘गोलमाल’      

अँजिओप्लास्टीमध्ये धमनीतील अडसर शोधण्यासाठी ‘गायडिंग कॅथेटर’चा वापर

स्टेंट टाकताना ‘बलून कॅथेटर’ वापरतात

ही उपकरणे एकदाच वापरायची असतात

काही रूग्णालयात कॅथेटर पुन्हा वापरले जाते

इथिलिन ऑक्साइड प्रक्रियेद्वारे या उपकरणांचे निर्जंतुकीकरण करतात

निर्जंतुकीकरणानंतर ही उपकरणे दुसऱ्यांदा वापरण्यासाठी कॅथलॅबमध्ये पाठवतात

कॅथेटर रुग्णालयांना 7 ते 9 हजार रुपयांना घाऊक किंमतीत मिळते

पहिल्या रुग्णांसाठी 22 ते 25 हजारांत विक्री

पुनर्वापर करतानाही 11 ते 20 हजार इतकी किंमत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *