Wed. Dec 1st, 2021

453 कोटी द्या अन्यथा तुरुंगात जा; अनिल अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका

सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधातील एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर बुधवारी निर्णय दिला आहे.

अनिल अंबानी यांनी 4 आठवड्यात थकवलेले 453 कोटी रुपये भरावे अन्यथा 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यास तयार रहावे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

देशातील दूरसंचार जाळे वापरण्यासंदर्भातील व्यवहारापोटी थकीत रक्कम व व्याज मिळून 550 कोटी रुपये संदर्भात एरिक्सनने रिलायन्स कम्युनिकेशन्सला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

न्या. आर. एफ. नरिमन आणि न्या. विनीत सरन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

एरिक्सन इंडियाच्या वतीने बाजूने विधिज्ज्ञ दुष्यंत दवे यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधातील दावा लावून धरला.

कोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला.

तर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी एरिक्सनच्या वकिलांचा मुद्दा सुनावणी दरम्यान अव्हेरला होता. या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.

न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्यूनिकेशन्सच्या 2 अधिकाऱ्यांना दोषी ठरवले आहे.

याशिवाय समुहातील 3 कंपन्यांना एक कोटी रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.

4 आठवड्यांमध्ये हे पैसे बँकेत जमा करावे किंवा कंपनीच्या प्रमुखाला एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

रिलायन्स समुहातील 3 कंपन्यांनी सुप्रीम कोर्टाच्या डेडलाइनचे पालन केले नाही.

तसेच कोर्टात चुकीची माहिती देखील दिली, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांना एरिक्सन कंपनीचे थकवलेले 453 कोटी रुपये 4 आठवड्यात भरावे अन्यथा तुरुंगवासासाठी तयार रहावे, असे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *