Mon. Dec 6th, 2021

‘अनिल देशमुखांच्या आग्रहामुळेच पोलिस खात्यात’ – सचिन वाझे

   ठाण्यातील मनसुख हिरेन यांच्या हत्याप्रकरणी तुरुंगात असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची चांदिवाल समितीपुढे साक्ष लक्षवेधी ठरली आहे. चांदिवाल समितीने सचिन वाझे यांची चौकशी करण्यात आली. अनिल देशमुखांच्या आग्रहामुळेच पोलिस खात्यात आले असल्याचा विधान सचिन वाझे यांनी केले आहे. त्यामुळे सचिन वाझेच्या या वक्तव्यामुळे अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  सचिन वाझे यांनी चांदिवाल समितीपुढे जबानी दिली. मात्र सचिन वाझेंची ही जबानी महत्त्वपूर्ण ठरली असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय म्हणाले सचिन वाझे?

   माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरूनच मी पुन्हा पोलीस सेवेत  रुजू होण्यासाठी अरज सादर केला. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या स्वाक्षरीच्या आदेशाने मला पुन्हा सेवेत घेण्यात आले असे म्हणणे चुकीचे होईल. माझ्या निलंबन काळात मा परमबीर सिंग यांना अनेक प्रकरणात सहाय्य करण्यासाठीच सेवेत पुन्हा रुजू होण्यासाठी भेटलो होतो.

  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी खंडणीचे आरोप केले आहेत. तसेच देशमुखांनी खंडणी वसुलीसाठी सचिन वाझेचाही वापर केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासठी चांदिवाल समितीची नेमणुक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *