Mon. Sep 20th, 2021

अनिल कपूरच्या ‘या’ सुपरहिट सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘नायक’ सिनेमा सन 2001 मध्ये प्रदर्शित झाला आणि सुपरडुपर हिट झाला.

एक सामान्य तरूण एक दिवसाचा मुख्यमंत्री बनतो आणि या एका दिवसांत अख्ख्या राज्याचे चित्र बदलतो, असे या सिनेमाचे कथानक होते.

राणी मुखर्जी आणि दिवंगत अमरिश पुरी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

हा सिनेमा प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. अशात या सिनेमाचा सीक्वल येणार म्हटल्यावर सगळेच उत्सुक असणार आहेत.

विशेषत म्हणजे या सीक्वलमध्ये कुणाची वर्णी लागते, यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

‘टोटल धमाल’नंतर अनिल कपूर लवकरच एका सिनेमात निगेटीव्ह भूमिका साकारताना दिसणार आहेत.

या सिनेमात आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी मुख्य भूमिकेत असतील. येत्या मार्चपासून या सिनेमाचे शूटींग सुरु होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *