Thu. Apr 2nd, 2020

विषारी वनस्पती खाल्याने 45 जनावरे दगावली

रानात विषारी वनस्पती खाल्याने अमरावतीतील वडगाव राजदी येथील ४५ जनावरे दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर गावातील बहुतांश जनावरांची प्रकृती सद्या गंभीर आहे.

गावातील गुराखीने रानात जनावरे नेली असतांना ढोर काकडा नावाची वनस्पती खाण्यात आल्याने जनावरांना विषबाधा झाली. त्यामुळे जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशु वैद्यकिय अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी औषधोपचार केले.

मात्र जनावरांनी ढोर काकडा वनस्पती जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वाचू शकली नाही.

या परिसरात हिवाळ्या ऋतूत वाढणारी ढोर काकडा वनस्पती जास्त प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांनी या जनावरांना वनस्पतीपासून दूर ठेवावे असे आवाहन केले आहे.

दरम्यान जनावरे दगवल्याने वडगाव राजदी येथील शेतकऱ्यांवर मोठं संकट आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *