Tue. Oct 26th, 2021

‘राज ठाकरे सहपरिवार सत्यनारायणाच्या पूजेला निघालेत का?’, अंजली दमानिया यांचं ट्विट

‘कोहिनूर’ प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ED च्या चौकशीसाठी रवाना झाले आहेत. सकाळी 10.30 वाजता शिवाजी पार्क येथील ‘कृष्णकुंज’ येथील आपल्या निवासस्थानावरून ते निघाले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली आणि मुलगी उर्वशी हे देखील ED कार्यालयाकडे निघाले. याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपरोधिक Tweet केलंय.

राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण सगळे मिळून माहिती देणार आहेत का? हा काय drama चालू आहे? की सहानुभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न आहे? असा सवाल त्यांनी केलाय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *