Sun. Sep 19th, 2021

27 वर्षीय अंकितीने गाठले यशाचे शिखर, 4 वर्षात केली ‘ही’ मोठी कामगिरी

मुंबईची अंकिती बोस या 27 वर्षीय तरूणीने अवघ्या 4 वर्षाच्या काळात आपल्या झीलिंगो ई-कॉमर्स कंपनीला शिखरावर पोहचवलं आहे.

अंकिती बोसच्या कंपनीला युनिकॉर्नचा दर्जा मिळवण्याच्या अगदी जवळ नेणारी अंकिती ही पहिली भारतीय महिला बनली आहे.

झीलिंगो ही दक्षिण-पूर्ण आशियातील नामांकित फॅशन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपनी आहे.

झीलिंगो हे प्लॅटफॉर्म थायलंड, इंडोनेशिया आणि फिलिपीन्समध्ये प्रसिद्ध आहे. अंकिती ही या कंपनीची सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीही आहे.

ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल एक अब्ज अमेरिकी डॉलर्स असेल त्या कंपनीला यूनिकॉर्नचा दर्जा दिला जातो.

अंकिता-ध्रुव यांच्या स्टार्टअपचे बाजारमूल्य सध्या 970 मिलियन डॉलर्स एवढे आहे.

झीलिंगो कंपनीचे मुख्यालय सिंगापूरमध्ये असून या कंपनीची टेक टीम बंगळुरूमधून काम करते.

कंपनीचा आणखी एक सहसंस्थापक आयआयटी गुवाहाटीमध्ये शिकणारा 24 वर्षीय विद्यार्थी ध्रुव कपूर आहे. ध्रुवच्या टीममद्ये जवळपास 100 जण काम करतात.

2012मध्ये अंकितीने अर्थशास्त्र आणि गणितामध्ये मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी घेतली आहे.

बँकेतील एका प्रसंगानंतर तिने ऑनलाइन मार्केटमध्ये उतरण्याचे ठरवले.

त्यानंतर 2014मध्ये तिची ओळख ध्रुवशी झाली. त्यावेळी या दोघांनी मिळून या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.

त्यावर तात्काळ काम सुरू केले. भारतात फिल्पकार्ट, अॅमेझॉन सारख्या कंपनीने आपलं जाळं निर्णाण केल्यामुळे त्यांनी भारताबाहेर उतरवण्याचे ठरवले.

त्यांच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात 2015मध्ये ‘झीलिंगो’च्या नावाने अस्तित्वात आली. तब्बल 4 वर्षानंतर ही कंपनी 970 मिलियन डॉलर्सची झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *