Sat. May 25th, 2019

‘तुमच्या हातात काही नाही’ म्हणत अण्णांनी नाकारली महाजनांची भेट!

216Shares

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. राळेगणसिद्धीच्या संत यादवबाबा मंदिरात त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांची मनधरणी करण्याकरता जलसंपदामंत्री गिरीश महाजन येणार होते. मात्र त्यांना येऊ नका असा थेट इशाराच अण्णांनी दिलाय.

“तुमचा बॉस दिल्लीत बसलाय”

अण्णांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात करताच त्यांची समजूत काढायला गिरीश महाजन येण्यास निघाले.

मात्र अण्णांनी त्यांना येऊ नका, असं फोन करून कळवून टाकलं.

महाजनांना भेटून काही उपयोग नाही. कारण त्यांच्या हातात काहीच नाही, असं अण्णा म्हणाले.

तुमच्या येण्याने जनतेत संभ्रम निर्माण होईल, असं मत अण्णांनी महाजनांना कळवलं.

तुमच्याकडून काही होणं शक्य नाही.

तुमचा बॉस दिल्लीला बसला आहे

अशा शब्दांत अण्णांनी महाजनांची भेट नाकारली.

अण्णांच्या या भूमिकेमुळे गिरीश महाजन यांना आपला दौरा रद्द करावा लागला आहे. दरम्यान अण्णांनी उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती महाजन यांनी केली आहे.

अण्णांच्या 90% मागण्या मान्य!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणावर असून कॅबिनेटने लोकायुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्र्यांचा समावेश करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सुमारे 80 ते 90 टक्के मागण्या मान्य करण्यात आले आहे. तरीही ते उपोषणावर ठाम आहेत.

जलसंपादमंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना ग्वाही दिली की, याबाबत येत्या 1-2 दिवसांत अण्णांची भेट घेऊ, वय आणि तब्येत पाहता आण्णांनी उपोषण मागे घ्यावे. त्यांच्या उर्वरित मागण्याही लवकरच मान्य होतील.

लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारे बेमुदत उपोषण करणार आहेत.

सकाळी 11च्या सुमारास राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात दर्शन घेऊन हजारेंनी उपोषणाला सुरुवात केली.

लोकायुक्त नियुक्त करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे.

तरी, विधानसभेच्या मंजुरीशिवाय त्याचे कायद्यात रुपांतर होणार नाही.

त्यामुळे आंदोलनावर ठाम असल्याचे हजारेंनी सांगितले आहे.

महाजन अण्णांची भेट घेणार आहेत.

मात्र, त्यांचा उपोषणाचा आक्रमक पवित्रा पाहता त्यांनी राळेगणसिद्धीला येण्याचे टाळल्याचे बोलले जाते.

त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आता लोकायुक्ताच्या कक्षेत मुख्यमंत्रीही येतील.

असं करणारे महाराष्ट्र हे पहिलच राज्य आहे.

अण्णांची ही पहिली मागणी सरकारने मान्य केली आहे.

स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणी संदर्भात त्यांची दुसरी मागणी होती.

त्यांनी शेतमालाला दीडपट दराची मागणी केलेली.

आपण सध्या शेतकऱ्यांना चांगला भाव देतोच.

त्यांच्या सुमारे 80 ते 90 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत.

मात्र, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय अण्णा हजारे उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *