Thu. Jun 20th, 2019

मालिकेतील ‘या’ व्हिलनचा देशाच्या हिरोंसाठी मदतीचा हात!

0Shares

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या खूप उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला चांगलंच डोक्यावर घेतलंय. या मालिकेतील विवध पात्रंनी प्रेक्षकांच्य मनावर गारूड घातलंय. शेवंता आणि अण्णा नाईक या व्यक्तिरेखातर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर गाजल्या. या पात्रांशी संबंधित अनेक जोक्स, memes  सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र मराठी मालिकाविश्वातील खलनायक अण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर यांनी प्रत्यक्ष जीवनात देशाच्या हिरोंसाठी एक उपक्रम सुरू करून अभिनंदनीय काम केलं आहे.

अण्णांचा भारतीय सैनिकांना मदतीचा हात

‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेचं shooting सावंतवाडीमध्ये असलेल्या आकेरी या गावात सुरू आहे.

या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंतासह सर्व कलाकारांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी सेटवर कायम गर्दी होत असते.

या मालिकेतील अण्णा नाईक म्हणजेच अभिनेता माधव अभ्यंकर यांनी जानेवारी महिन्यापासून एक उपक्रम सुरू केला आहे.

ज्या सैनिकांच्या बलिदानामुळे आपण निर्धास्तपणे जगत असतो, त्या सैनिकांच्या मदतीसाठी आपल्यापरीने मदत करण्याच्या हेतूने माधव अभ्यंकर यांनी सेटवरच एक ‘ड्रॉप बॉक्स’ ठेवला आहे.

या ड्रॉपबॉक्समध्ये सैनिकांच्या मदतीसाठी निधी जमा केला जातो.

या ड्रॉप बॉक्सवर ‘सेल्फी फॉर सेल्फ रिस्पेक्ट, सैनिकहो तुमच्यासाठी! असे लिहिलं आहे.

‘मी तुमच्यासोबत सेल्फी काढेन, पण तुम्ही सैनिकांसाठी तुम्हाला शक्य होईल तितकी मदत करा’, असं आवाहन अभ्यंकर  चाहत्यांना करतात.

फॅन्सकडूनही त्यांच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुकही होतंय.

फॅन्स आपल्यापरीने सैनिकांसाठी  ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत जमेल तितकी रक्कम या मदत निधीसाठी ड्रॉप बॉक्समध्ये जमा करत असतात.

फॅन्सच्या उत्तम प्रतिसादामुळे एक ड्रॉप बॉक्स पूर्ण भरला असून लवकरच दुसरा बॉक्सदेखील भरणार आहे.

त्यानंतर दोन्ही बॉक्समध्ये जमा झालेला निधी सैनिकांच्या मदतीसाठी पंतप्रधान निधीला देणार असल्याचं अभिनेते माधव अभ्यंकर यांनी स्पष्ट केलंय.

छोट्या पडद्यावर खलनायकी भूमिका समरसून निभावणाऱ्या अभ्यंकर यांची देशाच्या Real hero प्रती असणारी भावना ही एका नायकापेक्षा कमी नाही.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: