Sun. Jun 20th, 2021

“धर्मनिरपेक्ष गणपती बाप्पाला घोषित करा राष्ट्रदेव!”

www.Whoa.in

भारतात ज्याप्रमाणे  राष्ट्रगीत आहे, राष्ट्रचिन्ह आहे, राष्ट्रीय प्राणी आहे  त्याप्रमाणे राष्ट्रदेवही असावा; अशी अजब मागणी अध्यात्मिक गुरू रमेशभाई ओझा यांनी केली आहे. एवढंच नव्हे, तर गणपती बाप्पाला राष्ट्रदेव घोषित करावं अशीही सूचना त्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे हे वक्तव्य त्यांनी कोणतय्ही धर्मपरिषदेत केलेलं नसून MIT विश्व शांती विद्यापीठामध्ये आयोजित भारतीय छात्रा संसदेच्या उद्घाटनप्रसंगी केलं आहे.

राष्ट्रदेव म्हणजे काय?

‘जन गण मन’ हे भारताचं राष्ट्रगीत आहे. मात्र ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीताचा दर्जा मिळावा अशी मागणी अधून मधून डोकं वर काढत असते. वाघाऐवजी गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात यावं अशीही मागणी मध्यंतरी करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनीही एका सभेत भगवद् गीतेला राष्ट्रग्रंथ घोषित करावं, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली होती. आता या सर्वांवर कडी करत आध्यात्मिक गुरू रमेशभाई ओझा यांनी भारताचा राष्ट्रदेव असावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.

भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याने अशा प्रकारे देशाचा एक राष्ट्रदेव कसा ठरवता येऊ शकतो? असा प्रश्न जर निर्माण होत असेल, तर त्याचंही उत्तर ओझा यांनी परस्पर देऊन टाकलं आहे. गणपती बाप्पाला राष्ट्रदेव घोषित करावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. गणपती हा धर्मनिरपेक्ष देव असल्याचा जावईशोधही त्यांनी लावला आहे. म्हणूनच गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

आपल्याकडे राष्ट्रदेव नसल्याची खंत रमेशभाई ओझा भारतीय छात्रा संसदेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. प्रथम पुजनीय गणपती बप्पाला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळायला हवी, अशी रमेशभाई ओझा यांची अपेक्षा आहे.

नेत्यांनी व्हावं गणपतीप्रमाणे!

शिवाय गणपतीची लांब सोंड, मोठे कान, मोठे पोट हे सगळं प्रतीकात्मकपणे आपल्या नेत्यांमध्येही हवे. गणपतीप्रमाणे मोठे कान म्हणजे त्याने प्रत्येकाचे म्हणणं ऐकून घेता येईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

ओझा यांच्या वक्तव्याचा ‘भीम आर्मी’कडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *