गडकिल्ल्यांची फोटो आणि व्हिडियोग्राफी स्पर्धा, मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा

महाराष्ट्राला ऐतिहासिक गड किल्ल्यांचा वारसा लाभला आहे. या गड किल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नवी घोषणा केली आहे.
आदित्य ठाकरेंनी गड किल्ल्यांच्या फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाद्वारे करण्यात आलं आहे.
८ ते २२ जानेवारी २०२० या कालावधीत ही स्पर्धा आयोजित केलाी आहे. या संदर्भातली माहिती मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली.
यामध्ये व्हिडिओग्राफी व छायाचित्रण स्पर्धा असेल.
राज्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची देश – विदेशातील पर्यटकांना ओळख करून देणे, सर्वसामान्यांमध्ये गड – दुर्ग किल्ल्यांबाबत आकर्षण व आवड निर्माण करणे, तसेच पर्यटक व अभ्यागत यांना या गड – दूर्ग किल्ल्यांबाबतची ऐतिहासिक माहिती करुन देणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास यासाठी विविध उपक्रम राबविले जातील, असे मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
ही स्पर्धा खुल्या आणि व्यावसायिक अशा २ श्रेणीत विभागली आहे.
फोटो आणि व्हिडिओग्राफीची आवड असणारे आणि व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओग्राफी करणाऱ्या अशांसाठी ही स्पर्धा असणार आहे.
खुला गट
फोटो आणि व्हिडिओग्राफीची आवड असणाऱ्यांना खुल्या श्रेणीत भाग घेता येणार आहे. या श्रेणीत प्रथम ३ क्रमांकाच्या विजेत्यांना ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
तर १० उल्लेखनीय स्पर्धकांसाठी २ हजाराचं पारितोषक देण्यात येणार आहे.
व्यावसायिक गट
या गटामध्ये व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओग्राफी करणारे या गटात असणार आहेत.
या गटातील फोटोग्राफी स्पर्धेतील पहिल्या ३ विजयी स्पर्धकांना प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षिस दिलं जाणार आहे.
तर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना १० हजारांचा पारितोषिक असणार आहे.
व्यावसायिक गटामधील व्हिडिओग्राफी स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला १ लाख रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे.
तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ७५ आणि ५० हजाराचं बक्षिस मिळणार आहे.
तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १० स्पर्धकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.
सहभागी स्पर्धकांना त्यांनी काढलेल फोटो आणि व्हिडिओ हॅशटग वापरुन पोस्ट करायचे आहेत.
#MaharashtraTourismContest आणि #MaharashtraTourism हे दोन हॅशटग वापरुन फोटो पोस्ट करायचे आहेत.
अधिक माहितीसाठी क्लिक करा : https://www.facebook.com/MaharashtraTourismOfficial/