Sat. Oct 1st, 2022

भेंडवळचं भाकीत जाहीर

बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा भेंडवNच्या घटमांडणीतील भाकीत जाहीर झाली आहेत. यावर्षी पीक पाऊस, चांगला असल्याचं अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशावर आर्थिक संकट तसेच परकीय शक्तींपासून त्रास होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या घटमांडणीतील पुरी गायब आहे. पुरी हे पृथ्वीचे प्रतीक असल्याने पृथ्वीवर नैसर्गिक संकट असून भूस्खलन सारख्या घटना घडू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातील असंख्य शेतकरी याच घटमांडणीच्या आधारे खरीप आणि रब्बी हंगामाचे नियोजन करत असतात. ही भाकीत ऐकण्यासाठी दूरवरून शेतकरी येत असतात. या घटमांडणीत गावाच्या पूर्वेस एका शेतात अठरा प्रकारची धान्ये एका गोलाकार आकारात ठराविक अंतरावर ठेऊन या गोलाच्या मध्यभागी एक खड्डा तयार करून त्यात चार मातीचे गोळे ठेऊन त्यावर एक पाण्याची घागर ठेऊन त्यावर पुरी, करंजी, पान सुपारी ठेवण्यात येते. प्रत्येक वस्तू एका प्रतिकाप्रमाणे वापरली जाते.

अक्षय तृतीयेची रात्र या घटमांडणीवरून गेल्या नंतर या घाटात झालेल्या बदलांच्या आधारे देशातील पीक-पाणी राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती यासह विविध विषयांवर अंदाज वर्तविला जातो.आज सकाळी सूर्योदयाच्या वेळेस या घटमांडणीत झालेल्या बदलाच्या आधारे ही भाकीत वरवण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.