Wed. Jun 29th, 2022

किसान पुत्र संघटनेतर्फे राज्यात अन्नत्याग आंदोलन

यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने 34 वर्षापूर्वी 19 मार्च रोजी कुटुंबासह आत्महत्या केली होती. त्यांची आठवण म्हणून आज किसान पुत्र संघटनेतर्फे राज्यभर अन्नत्याग आंदोलन केलं गेलं. या आंदोलनात शाळकरी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण सहभागी झाले आहेत. करोना मुळे लोकांची गर्दी होऊ नये म्हणून ज्याने त्याने आहे त्या ठिकाणी एकदिवसाचा अन्न त्याग केला .

किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी सहकाऱ्यांसह पुण्यातील फुलेवाडा येथे जाऊन महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई यांना अभिवादन करून बालगंधर्व रंगमंदिराच्याच्या समोर येऊन दिवसभर उपोषण केले.

केवळ शेतकरी विरोधी कायदे अस्तित्वात असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी किसान पुत्र संघटनेतर्फे अमर हबीब यांनी केली आहे.

त्यांनी केलेल्या मागणीनुसार कमाल शेतजमीन धारण कायदा, आवश्यक वस्तू कायदा आणि आणि जमीन अधिग्रहण कायदा रद्द झाला पाहिजे अशी मागणी केली आहे. हे तीन कायदे रद्द केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असा दावा अमर हबीब यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.