Jaimaharashtra news

काँग्रेसच्या पाच नेत्यांचे ट्वीटर खाते बंद

बुधवारी संसदेचं वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार घडला. यावेळी विरोधकांनी आपल्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर मार्शल्सकडून खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांवर हल्ला झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर “माझ्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत असं काही घडताना मी पाहिलं नाही”, असं म्हणत आपला निषेध व्यक्त केला आहे. या घटनेविरोधात आज काँग्रेसकडून दिल्लीमध्ये निदर्शनं देखील केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर नेमकं राज्यसभेत त्या वेळी काय घडलं? याचा व्हिडीओ समोर आला आहे. एएनआयनं हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

राज्यसभेमध्ये चर्चा सुरू असताना बुधवारी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू केली होती. पेगॅसस आणि कृषी विधेयकांप्रमाणेच अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली. यावेळी विरोधी पक्षाच्या काही महिला खासदारांनी वेलमध्ये उतरून कागद फाडून भिरकावले. तसेच, अनेक विरोधी पक्षाचे खासदार वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी मार्शल्सकरवी एक कडंच राज्यसभेत उभं करण्यात आलं. या प्रकारावरून सरकरावर विरोधकांनी लोकशाहीची हत्या केल्याची टीका केली आहे.

ट्विटरने राहुल गांधी यांचं खातं नुकतंच तात्पुरतं बंद केलं होतं. राहुल गांधी यांनी ट्विटरला दिल्लीमधील नऊ वर्षीय बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचा फोटो हटवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठवत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसने दावा केलाय की रणदीप सुरजेवाला यांच्यासह पाच वरिष्ठ नेत्यांच्या अकाऊंटवर अशीच कारवाई करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसाम प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आली आहेत असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं आहे.

दिल्ली छावणीतील स्मशानभूमीत कथित बलात्कार आणि हत्या झालेल्या नऊ वर्षांच्या दलित मुलीच्या आई-वडिलांचे छायाचित्र शेअर केल्यामुळे त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे खाते लॉक केले आहे. शिवाय, ट्विट देखील काढून टाकण्यात आले आहे. तसेच, हे आमच्या धोरणाविरूद्ध असल्याने आम्ही ते ट्विट डिलिट केले असल्याची माहिती ट्विटरकडून दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आली होती.

Exit mobile version