Wed. Jun 16th, 2021

कार्तिक आर्यन विरोधात बॉलिवूडमध्ये कॅम्पेन? मोठ्या दिग्दर्शकाने व्यक्त केली चिंता

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सिनेसृष्टीत प्रसिद्ध अभिनेता असून त्याचा चाहतावर्ग फार मोठा आहे. तसेच कार्तिक आर्यनचा अतिशय मनमोकळा स्वभावचा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कार्तिक बाबत फार वाईट घडतांना दिसत आहे. एका काळात कार्तिककडे खूप प्रोजेक्ट होते पण या सगळे आगामी प्रोजेक्टस त्याने गमावले आहेत. यावर सिनेमा दिग्दर्शक अनुभव सिन्हाने चिंता व्यक्त केली आहे. अनुभव यांनी टि्वट करून कार्तिकला पाठिंबा दिला आहे. यामुळे कार्तिक हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काय आहे नेमकं प्रकरण पहिल्यांदा कार्तिक आर्यनला काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या ‘दोस्ताना 2′ सिनेमातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर कार्तिकला शाहरूख खानच्या रेड चिलीज प्रोडक्शन हाऊसमधून ‘फ्रेडी’ या चित्रपटातून काढले. तसेच आनंद एल रायच्या सिनेमातून देखील काढण्यात आले. त्यानंतर आनंद एल राय यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटलं की, ही चुकीची माहिती आहे. कार्तिक आर्यनला कधीच त्यांनी आपल्या कोणत्या आगामी सिनेमात साइन केलेलं नाही. असं त्यांनी सांगितलं. अशा चर्चा रंगल्यावर फिल्ममेकर अनुभव सिन्हा यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सिनेमा दिग्दर्शक अनुभव सिन्हाने ट्विट सिनेमा दिग्दर्शक अनुभव सिन्हाने यावर ट्विट करताना म्हटलंय की,’एक गोष्ट सांगतो. जेव्हा एखादा निर्माता अभिनेत्याला ड्रॉप करतो तेव्हा त्याला यावर बोलायचं नसतं. अगदी दोघांनाही यावर बोलायचं नसतं. असंच आतापर्यंत पाहण्यात आलंय. कार्तिक आर्यनच्या विरोधात कॅम्पेन चालवण्यात येत आहे. हे खूप चुकीचं आहे. कार्तिक आर्यनच्या शांत स्वभावाचं कौतुक करतो मी.’ असं कृत्य यापुर्वी देखील घडलं आहे ज्यामुळे सुशांत सिंहने आत्महत्या केली होती. त्यामुळे जर असं खरचं काही होतं असेल तर ही गंभीर बाब आहे. या कार्तिक आर्यन विरोधात बॉलिवूडमध्ये कॅम्पेन अनेक नेटकऱ्यांनी कार्तिकला पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *