Tue. Jan 18th, 2022

‘एखादा कुत्रा भुंकत असेल, तर माझ्याकडूनही भुंकण्याची अपेक्षा नको’

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल या माझ्या आई आहेत असा दावा केरळच्या एका महिलेने केला आहे. करमाला मे़डेक्स असं या महिलेच नाव आहे. करमाला यांनी अनुराधा यांच्या विरूद्ध कोर्टात दावा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकारावर अनुराधा पौडवाल चांगल्याच संतापल्या आहेत. ‘दावा करणाऱ्या बाईचं मानसिक संतुलन बिघडलं आहे’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“एखादा कुत्रा भुंकत असेल तर तुम्ही माझ्याकडूनही भुंकण्याची अपेक्षा करू शकतं नाही.” अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसंच ‘कोर्टाने कोणत्या आधारावर हे प्रकरण दाखल करून घेतलं’ असा प्रश्न विचारून त्यांनी शंका व्यक्त केली.

करमाला मेडेक्स म्हणते ‘अनुराधा पौडवाल माझी आई’

90 च्या दशकातील प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल आपल्या आई असल्याचा धक्कादायक दावा केरळमधील करमाला मेडेक्स या महिनेने केलाय.

आपण 4 वर्षांची असताना त्यांनी मला पोंनाचन आणि अगनेस या त्यांच्या मित्रांकडे ठेवलं.

ते केरळला राहत होते.

5 वर्षांपूर्वी माझे वडिल पोंनाचन वारले त्याआधी त्यांनी मला हे सत्य सांगितलं, असं करमालाचा दावा आहे.

त्या काळात अनुराधा पौडवाल गाण्यांच्या प्रोग्राममध्ये व्यस्त होत्या म्हणून त्यांनी माझ्या बाबतीत असं केलं असावं, असंही करमाला यांनी म्हटलं आहे.

ही गोष्ट कळल्यानंतर करमाला यांनी अनुराधा पौडवाल यांनी बर्याच वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आपल्याशी बोलणं टाळलं, आपला नंबरही नंबरही ब्लॅाक केला, असं आरोप त्यांनी केला आहे.

आईचं प्रेम न मिळाल्यामुळे हवे 50 कोटी!

करमाला यांना लहानपणापासून आईचे प्रेम मिळाले नाही.

त्यामुळे 50 कोटींची नुकसान भरपाई करमाला यांनी दिली पाहिजे.

अनुराधा पौडवाल यांनी करमाला यांना मुलगी म्हणून स्वीकारावं.

तसं न केल्यास आम्ही DNA टेस्टची मागणी करू, असं करमाला यांचे वकिल अनिल प्रसाद यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *