Thu. Jun 17th, 2021

नेटकऱ्यांकडून अनुराग कश्यपची मुलगी ट्रोल

मुंबई : बॉलिवूड स्टारकिड्स हे नेहमीच चर्चेत असतात. सध्या स्टारकिड्सची सर्वत्र चर्चा रंगतांना दिसते. अनुराग कश्यपची मुलगी आलिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर नेहमीच ती फोटो पोस्ट करत असते. आता आलिया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आलियाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहे. हा फोटो तिच्या बॉयफ्रेन्डसोबतचा आहे. बॉयफ्रेन्डसोबत फोटो व्हायरल होताचं सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे. तर तिच्या बॉयफ्रेन्डची खिल्ली उडवली जात आहे. एका युजरने ‘तुझा बॉयफ्रेन्ड गरीब का दिसतोय? ‘ असं विचारं तर दुसऱ्या युजरने ‘वडिलांवर गेली आहे.’ एवढचं नाही तर ‘लंगूर के हात मे अंगूर’ अशी कमेंट देखील तिच्या फोटोवर करण्यात आली आहे. यापुर्वी देखील आलियाने बॉयफ्रेन्डसोबत अनेक फोटो पोस्ट केले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. आलिया ही अनुराग कश्यप आणि त्याची पहिली पत्नी आरती बजाज यांची मुलगी आहे. तर सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. अभिनेत्री नसली तरी तिच्या चर्चा मात्र कायम रंगत असातात. आलिया ही लाईमलाईटमध्ये मात्र सध्याला तिला ट्रोल केलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *