Jaimaharashtra news

मोठ्या पडद्यापासून आणखी काही काळाचा ब्रेक, लेक ‘वामिका’साठी अनुष्का शर्माने घेतले मोठे निर्णय!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून ब्रेक घेतला आहे. ती शेवटच्या वेळी २०१८ मध्ये शाहरुख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर अनुष्काने पुनरागमन केले नाही. आता अनुष्काने तिचा हा ब्रेक आणखी वाढवला आहे. आता तिला आपला संपूर्ण वेळ लेक वामिकाच्या संगोपनात घालवायचा आहे. माध्यमांच्या काही अहवालांनुसार अनुष्काने २०२२ पर्यंत आपला हा ब्रेक वाढवला आहे

अनुष्का सध्या आपल्या मुलीच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करत आहे. यावेळी घराबाहेर जाऊन चित्रीकरण करून तिला कोणताही धोका पत्करायचा नाही. वृत्तानुसार, ऑक्टोबरमध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट येणार आहे, ज्याचा अधिक परिणाम लहान मुलांवर होताना दिसत आहे. अनुष्का यावेळी सर्व सेफ्टी प्रोटोकॉलची काळजी घेत आहे आणि घराबाहेर देखील जात नाही. यावर्षी कुठल्याही शूटची योजना आखू नका, असंही तिने आपल्या टीमला सांगितलं आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासमवेत इंग्लंडमध्ये आहे. विराट कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला आहे, अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासुद्धा त्याच्यासोबत गेल्या आहेत. तिथे आनंद घेत असताना अनुष्का फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राहते.

आता अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. मागील वर्षी अनुष्काने या चित्रपटाचा प्रोमो शूट केला होता. २०२२ मध्ये ‘या’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. याशिवाय अनुष्का आणखी दोन सिनेमांमध्ये काम करताना दिसणार आहे. त्यात एक यशराज फिल्म्सचा चित्रपट आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

 

Exit mobile version