Fri. Sep 24th, 2021

भारतीय औषध महानियंत्रकांकडून मॉडर्ना लसीच्या आयातीला मंजुरी

डीसीजीआयनं सिप्ला कंपनीला मॉडर्ना लस आयात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी मिळू शकते, अशी माहिती एएनआयनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. सध्या देशात कोविशील्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक V लसींचा वापर सुरू आहे. त्यातील स्पुटनिक V रशियन आहे. तर इतर दोन लसींचं उत्पादन भारतात होत आहे. मॉडर्नाच्या आपत्कालीन वापरास लवकरच परवानगी अपेक्षित आहे. तसं झाल्यास ती देशातील चौथी लस ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *