Sat. May 25th, 2019

एकाच आठवड्यात १८५० कोटींच्या विकासकामांचा मार्ग मोकळा

13Shares

कोणत्याही क्षणाला निवडणूक आचारसंहिता लागू होतील. यामुळे एकापाठोपाठ बैठका घवून विकासकामांनी मंजूरी दिली जात आहे.

एका आठवडयात बैठकीच्या नावाखाली तीन सभा बोलावून स्थायी समितीत १३६ प्रस्ताव मंजूर करून सुमारे १८५० कोटींच्या विकासकामांचा मार्ग मोकळा केला आहे.

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करण्यास अडचणी येतील म्हणूनचं विकास कामांचे प्रस्ताव समितीपुढे सादर करून मंजूर करुन घेतला जात आहे.

एकापाठोपाठ बैठका घेवून प्रस्तावांना मंजूरी

५ मार्च रोजी –  स्थायी समितीच्या सभेत पत्रिकेवर ३० विषय होते.३२ जादा विषय पटलावर ठेवण्यात आले. ही बैठकच तहकूब करण्यात आली.

८ मार्च  – या सभेच्या पटलावर ६६ जादा विषय ठेवण्यात आले. त्यामध्ये ८ जादा विषय पटलावर ठेवण्यात आले होते. ही बैठकही तहकूब करण्यात आली.

9 मार्च  – एकाच सभेच्या नावाखाली दोन अतिरिक्त तहकूब सभा बोलावून तब्बल १३६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

उपरोक्त तिन्ही सभांमध्ये मिळून १८५० कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

दरम्यान कोणतीही विकासकामे आचारसंहितेमुळे रखडू नयेत यासाठी या सभा बोलावून त्यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केले.

हे प्रस्ताव नगरसेवकांच्या सूचनेनुसारच समितीत मांडून मंजूर केले आहेत.

आचारसंहितेमुळे ही विकासकामे न रखडता त्यांची कामे वेगाने सुरु होतील.

असं स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितलं आहे.

‘या’ विकास कामांना मंजूरी

आर/दक्षिण मधील लहान रस्त्यांच्या सुधारणेसाठी ३३.५५ कोटी रुपये मंजूर

आर/दक्षिणमधील चौक आणि मोठ्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी ३१.७१ कोटी रुपये मंजूर

के/पश्चिम रिलिफ मार्ग येथील प्रतीक्षा नगर महापालिका शाळेच्या बांधकामासाठी ३०.३८ कोटी रुपये मंजूर

पश्चिम उपनगरातील छोट्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी ३२ कोटी रुपये मंजूर

गोरेगावमधील नोकरदार महिलांसाठी बहुउद्देशीय इमारतीच्या बांधकामासाठी  २८.४१ कोटी रुपये मंजूर

मुंबई मलनि:सारण प्रकल्प (भांडुप) दोन सल्लागार सेवेसठी २७.९२ कोटी रुपये मंजूर

गोवंडीतील पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालयाच्या आवारात इमारतीसाठी ४४० कोटी रुपये मंजूर

एमएसडीपी २ अंतर्गत सर्व मलजल प्रक्रिया केंद्रांसाठी सल्लागार सेवेसाठी १४४ कोटी रुपये मंजूर

नवीन वर्सोवा उदंचन केंद्रापर्यंत भूमिगत मलजल वाहक बोगदयासाठी १२५.७८ कोटी रुपये मंजूर

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *