Mon. Jan 24th, 2022

करून पाहा हा जर्दाळूचा डेझर्ट….

काहींना जेवनानंतर गोड खाण्याची सवय असते. या सवयीमुळे काहीजण बाहेरून डेझर्ट ऑर्डर करतात.

आता बाहेरून आणून खाण्यापेक्षा, घरच्या घरीही तुम्ही डेझर्ट बनवू शकता.

एपरीकॉट मूस हे खायलाही खूप स्वादिष्ट लागतात आणि हा एपरीकॉट मूस आपल्याला नक्की आवडेल. तर हा डेझर्ट तुम्हीही घरी नक्की बनवून पाहा.

 

साहित्य:-

सुखं जर्दाळूची प्युरी – ¾ कप

बीटन व्हीप्ड क्रीम – ¾ कप

कनडेन्स्ड मिल्क – 2 चमचा

क्रश केलेले डायजेस्टीव बिस्कीट – ¼ कप

सजावटीसाठी

बीटन व्हीप्ड क्रीम – 2 चमचं

कृती:

  • एक बाऊल घेऊन त्यामध्ये सुख्या जर्दाळूची प्युरी आणि कनडेन्स्ड मिल्क एकत्र मिसळून घ्या.
  • नंतर बीटन व्हीप्ड क्रीम घेऊन डायजेस्टीव बिस्कीट हलक्या हाताने एकजीव करून घ्या.
  • दोन वेगवेगळे बाऊल घ्या. त्यामध्ये हे मिश्रण एकसारख्या प्रमाणात टाका.
  • या मिश्रणाला 2 तास तसेच फ्रिजमध्ये ठेवून दया.
  • मुस थंड झाल्यानंतर त्यावर बीटन व्हीप्ड क्रीमने सजवा.
  • अशाप्रकारे आपला एपरीकॉट मुस तयार.
  • एपरीकॉट मुस थंडच सर्व्ह करा.

टिप:- ¾ कप सुखं जर्दाळूच्या प्युरीसाठी, 1 कप जर्दाळूला गरम पाण्यात 15 मिनिटे तसेच भिजत ठेवा. मग जर्दाळूची बी काढून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये थोडेसे पाणी टाकून जर्दाळूला बारीक करून त्याची प्युरी बनवून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *