Sun. Aug 18th, 2019

‘लक्ष्यभेदी’ अपूर्वी चंडेला जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी, भारतीय नेमबाजांचा प्रभाव

0Shares

एअर रायफल 10 मीटर नेमबाजी विभागात भारतीय नेमबाज अपूर्वी चंडेला हिने जागतिक क्रमवारीमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. गेल्या काही वर्षांपासून नेमबाजीमध्ये सातत्याने दमदार कामगिरी केल्यामुळे अपूर्वी अव्वल स्थानी पोहोचली आहे. तिला 2020 साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्येही प्रवेश मिळाला आहे.

अपूर्वीचा लक्ष्यभेदी प्रवास!

2016 साली रियो ऑलिम्पिकमध्ये अपूर्वीची कामगिरी तितकीशी चांगली न झाल्यामुळे ती नाराज होती.

मात्र त्यानंतर तिने सातत्याने चांगली कामगिरी केली.

2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावलं होतं.

2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवलं होतं.

2018 मध्ये एशियाडमध्ये 10 मीटर एअर रायफलच्या मिश्र सांघिक गटात तिने Bronze Medalची कमाई केली होती.

2019 साली फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या World Cup मध्ये 252.9 गूण मिळवत तिने Gold Medal तर मिळवलंच, शिवाय तिच्या नावावर विश्वविक्रमही नोंदवला गेला.

मात्र बीजिंगमध्ये येथे सुरू असलेल्या World Cup स्पर्धेत अपूर्वीला पदकाने हुलकावणी दिली.

10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत ती चौथ्या क्रमांकावर होती.

असं असलं, तरी अपूर्वीला जागतिक क्रमवारीत यशातील सातत्यामुळे अव्वल क्रमांक मिळाला आहे. याबद्दलचा आनंद तिने Tweet करून शेअर केलाय.

 

दुसऱ्या क्रमांकावरही भारतीयच नेमबाज!

कौतुकाची बाब म्हणजे जागतिक क्रमवारीमध्ये केवळ पहिल्याच क्रमांकावर नव्हे, तर दुसऱ्या क्रमांकावरही भारतीय नेमबाजच आहे. 10 मीटर एअर रायफल विभागातच दुसऱ्या स्थानावर अंजुम मुद्गिल हिचा नंबर आहे.

बीजिंगच्या नेमबाजी World Cup मधील मिश्र सांघिक गटात तिने सुवर्णपदक मिळवलं होतं.

या दोघींशिवाय नेमबाज मनू भाकर हिचा 25 मीटर एअर पिस्तूलच्या जागतिक क्रमवारीत 10 वा क्रमांक आहे.

जागतिक क्रमवारीत पुरूषही पुढेच

दिव्यांश सिंह पन्वरने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल विभागात चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.

10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण मिळवणार्‍या अभिषेक वर्माने जागतिक क्रमवारीत तिसरं स्थान पटकावलं आहे.

नेमबाज सौरभ चौधरीही जागतिक क्रमवारीत 6 व्या नंबरवर आहे.

25 मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये अनिश भानवाला 10 व्या क्रमांकावर आहे.

एकूणच भारतीय नेमबाज या खेळावर आपलं वर्चस्व गाजवत असल्याचं दिसून येत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *