Wed. Apr 14th, 2021

फोटोग्राफरवर भडकला अभिनेता अर्जुन कपूर

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा रविवारी रात्री एकत्र करीना कपूर खानच्या बाळाला पाहाण्यासाठी गेले होते. यावेळी अनेक फोटोग्राफर हे करीनाच्या अपार्टमेंट खाली उभे असून अर्जुन आणि मलायकाचे फोटो काढण्यासाठी प्रयत्न करत असताना एक फोटोग्राफर अपार्टमेंटच्या गेटवर चढला होता. यानंतर अर्जुनला राग आला त्यानंतर अर्जुन हा फोटोग्राफरवर भडकला. त्यानंतर अर्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘तुम्ही बिल्डिंगच्या भिंतीवर असं चढू नका. हे फार चुकीचं आहे. मी तुम्हाला विनंती करतो’ असे अर्जुन सुरुवातीला फोटोग्राफरला बोलताना दिसत आहे. पण फोटोग्राफरने ऐकले नाही हे पाहून अर्जुन चिडतो. ‘मी विनंती करत आहे पण तुम्ही ऐकायला तयार नाही. अरे… लाल शर्टवाला… आता घाबरून का पळत आहेस’ असं अर्जुन चिडून बोलताना दिसत आहे. अर्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन हा अनेक एकत्र दिसतात आणि त्यांचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. शिवाय गेल्या काही दिवसापासून अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत आहे आणि मलायका आणि अर्जुन लग्नबंधनात कधी अडकणार याची अनेकांना वाट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *