Sun. Mar 24th, 2019

अर्जुन खोतकरांची लोकसभा निवडणुकीतून माघार नाहीच

529Shares

काही दिवसांपासून जालनामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात वाद सुरू आहे. सेना- भाजपाची युती झाल्यामुळे एकाच उमेदवाराला निवडणुक लढवता येणार असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. युतीपूर्वी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे जालन्यात रावसाहेब दानवे यांच्याविरोधात उभे राहणार होते. मात्र युतीमुळे जालन्यात वाद निर्माण झाला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चर्चेतुन तोडगा काढण्याचा पर्यत्न केला. मात्र तरीही खोतकर यांनी लोकसभा निवडणुक लढवण्यापासून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

भाजप- सेना युतीपूर्वी शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे राज्यमंत्री अर्जुन खोतकर रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुक लढवणार होते.

युती झाल्यानंतर खोतकर जालन्यातून लोकसभा निवडणुकीतून माघार घेतील अशी चर्चा होती.

मात्र खोतकर यांनी माघार घेतली नसून मोठा वाद निर्माण झाला आहे.

हा वाद लोकसभा निवडणुकांपूर्वी मिटवण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी खोतकर यांची जालन्यात भेट घेतली.

सुभाष देशमुख यांच्यासह रावसाहेब दानवे यांनीही भेट घेतली.

या नेत्यांची दीड तास चर्चा झाली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली असून खोतकर यांनी माघार घेतली नाही.

सुभाष देशमुख काय म्हणाले ?

सुभाष देशमुख यांनी अर्जुन खोतकर यांची आज भेट घेतली.

खोतकर यांच्या नसानसांत शिवसेना भिनलेली आहे.

अर्जुन खोतकर कधीच शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये जाणार नाही असा विश्वास सुभाष देशमुख यांनी दाखवला आहे.

युती झाल्यामुळे लवकरच दानवे आणि खोतकर जालन्यात युतीचं काम करतील.

मात्र या चर्चेनंतरही अर्जुन खोतकर यांनी लोकसभेतून माघार घेतली नसल्याचे समजते आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *