Sat. May 25th, 2019

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची जालन्यातून माघार

612Shares

भाजप- सेनेची युती झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात जालना मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावरून वाद सुरू झाला. मात्र आज औरंगाबादमध्ये भाजप- सेनेची बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचा आदेश माझ्यासाठी अंतिम असल्याचे खोतकर म्हणाले आहे.

नेमका वाद काय ?

भाजप- सेनाची युती होण्यापूर्वी शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

मात्र त्यानंतर भाजप- सेनेची युती झाली. मात्र जालन्यातील कार्यकर्त्यांनी इतर पक्षाचा प्रचार करणार नाही तसेच खोतकरांना निवडणूक लढण्याची संधी द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

तसेच दानवेंसाठी प्रचार करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

मात्र खोतकरांबरोबर अनेक नेत्यांनी चर्चा केल्यानंतरही या वादाला तोडगा मिळत नसल्याने खोतकरांनी माघार घेण्यापासून नकार दिला होता.

आज औरंगाबादमध्ये भाजप- सेनेची बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली.

अर्जुन खोतकर काय म्हणाले ?

उद्धव ठाकरे यांचा आदेश अंतिम असल्याचे खोतकर म्हणाले .

आता दिलेली जबाबदारी पार पाडेन आणि दगा फटका करणार नाही असेही खोतकर म्हणाले.

आता युतीच्या कामासाठी लागायचे आहे असे खोतकर यांनी सांगितले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *