Tue. Oct 26th, 2021

दुर्दैवी! देशासाठी लढणाऱ्या ‘या’ सैनिकावर न्यायासाठी लढण्याची आली आहे वेळ!

देशाच्य़ा रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावणाऱ्या एका सैनिकावर (Army man) न्यायासाठी लढायची वेळ आलीय. लान्स नायक विनोद जाधव सुट्टीकरिता वसईत घरी आले असता त्यांचा अपघात झाला (Hit and Run) आणि या अपघातात त्यांना चक्क एक पाय गमवावा लागला. मात्र, या अपघातास कारणीभूत असलेल्या मद्यपी वाहनचालकावर पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय.

काय घडलं नेमकं?

लान्स नायक विनोद जाधव हे डिसेंबर महिन्यात सुट्टीकरिता आले होते.

त्यांचं 1 डिसेंबरला लग्न होतं.

यानंतर 24 डिसेंबरच्या रात्री ते फिरायला गेले असता प्रचित चौधरी यांच्या चार चाकी गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. 

त्यात ते गंभीर जखमी झाले.

जाधव यांना त्वरित कुलाबा येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

जखम गंभीर असल्यानं जाधव यांच्या एका पायात लोखंडी रॉड घालावा लागला.

एक महिन्यांच्या उपचारानंतरही जाधव अद्याप पूर्णपणे बरे झाले नाहीत.

परिणामी ते ड्युटीवर सुद्धा जाऊ शकले नाहीत.

एक महिना उलटून सुद्धा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या प्रचित चौधरीवर कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप विनोद जाधव यांचे भाऊ विशाल जाधव यांनी केला आहे

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं होतं. मात्र, त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे कष्टही पोलिसांनी घेतले नसल्याचं जाधव यांचं म्हणणं आहे.

चौधरी सध्या जामीनावर बाहेर असला तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे.

देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी पणाला लावणाऱ्य  जवानांलाच आता स्वतःवरील अन्यायासाठी व्यवस्थेशी लढावं लागतंय ही शोकांतिका असल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *