Mon. Apr 19th, 2021

दाम दुप्पट योजनेचं आमिष दाखवून लष्करी अधिकाऱ्यांची फसवणूक

दाम दुप्पट योजनेच्या (Investment Plans) नावाखाली सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच आता थेट लष्करी अधिकाऱ्यांचीदेखील फसवणूक झाल्याचा धक्कादायक बाब नाशिक मध्ये उघडकीस आलाय. नाशिक रोड परिसरात असलेल्या ‘फ्युचर ट्रेडिंग सोल्युशन’ या कंपनीने महिन्याला आकर्षक व्याज (Interest) देण्याचं आमिष दाखवून ही फसवणूक (Fraud) केली आहे.

लष्करी अधिकाऱ्यांची फसवणूक

संशयित अरविंद सिंग आणि राजेश सिंग यांनी नाशिक रोड (Nashik) भागात फ्युचर ट्रेडिंग सोल्युशन ही कंपनी सुरू केली होती.

गुंतवणूक केलेल्या पैशावर महिन्याला आकर्षक व्याज देण्याचं त्यांनी आमिष दाखवलं.

या आमिषाला भूलून अनेकांनी या योजनेत (Investment plans) पैसे गुंतवले.

नाशिकच्या गांधीनगर परिसरात असलेल्या आर्टिलरी सेंटर मध्ये कर्नल या पदावर काम करत असलेल्या चार ते पाच लष्करी अधिकाऱ्यांनीही 47 लाख रुपयांची गुंतवणूक केली.

दिलेल्या वेळेत पैसे परत मिळत नसल्याने या अधिकाऱ्यांनी पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केल्याने ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी आधीच अटक असलेल्या दोन संचालकावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

दरम्यान या प्रकरणात लष्करी अधिकऱ्यांसोबत इतरही अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचा अंदाज (Crime) पोलिसांनी आहे.

त्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे असं आवाहन पोलिसांनी केलंय.

गेल्या काही वर्षात दामदुप्पट आणि आकर्षक परतावाच्या नावाखाली नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घातल्याचा घटना ताज्या असताना आता मात्र चक्क लष्करी अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *