Tue. Jun 15th, 2021

भारतीय लष्करातील जवानाच्या अपहरणाचे वृत्त खोटं

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झालेयानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरूचं आहेत.

त्यातच बडगाम जिल्ह्यातल्या गावामध्ये भारतीय लष्करातील जवान मोहम्मद यासीन यांचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आले असल्याच वृत्त प्रसारित करण्यात आले हाते

दरम्यान माध्यमांमध्ये सुरु असलेली जवानाच्या अपहरणाच्या बातमी खोटी असून जवान सुखरुप आहे. अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

कोणत्याही अफावंवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील संरक्षण मंत्रालयामार्फत करण्यात आलं आहे.

नेमकं घडलंय काय?

बडगाम जिल्ह्यातील क्वाझिपोरा चाडुरा गावचे रहिवासी असून जवान मोहम्मद यासीन हे भारतीय लष्करातील जाकली युनिटचे सदस्य आहेत.

यासीन हे २६ फेब्रुवारी रोजी सुट्टीवर आपल्या घरी आले होते.

शुक्रवारी काही दहशतवादी त्यांच्या घरात घुसले आणि ते यासीन यांना आपल्यासोबत घेऊन गेल्याची तक्रार जवानाच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये केली आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर शोध पथके त्यांच्या रवाना करण्यात आली आहेत.अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.असे वृत्त प्रसारित करण्यात आलं होत.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारताने केलेल्या कारवाईनंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट घोषित केला आहे,

काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि इतर सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे.

जवानाचं अपहरण झाल्याच्या  या बातमीमुळे  एकच खळबळ माजली होती.परंतु संरक्षण  मंत्रालयाकडून हे प्रसारित केलेले वृत्त खाटे असल्याचे सांगण्यात आलं आहे.

काही प्रसारमाध्यमांमध्ये लष्कर जवान मोहम्मद यासीन यांचं बडगाम येथून अपहरण झाल्याचं वृत्त देण्यात आलं असून ते चुकीचं आहे. ते सुरक्षित आहेत.

कृपया कोणतेही अंदाज व्यक्त केले जाऊ नयेत असं आवाहनही संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर जम्मू बस स्थानकावर झालेला ग्रेनेड हल्ला यामुळे आधीच जम्मू काश्मीरमध्ये तणाव असताना जवानाचं अपहरण झाल्याचं वृत्ताने खळबळ माजली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *