Sat. May 15th, 2021

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे केले गंभीर आरोप

किरीट सोमय्या यांनी गौप्यस्फोट केला…

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आलेली होती या अटकेवरून सध्या राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुबांतील व्यवहारावरून गौप्यस्फोट केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते आणि याबाबतीत का लवण्यात आलं आहे. असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, आहे. असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असे अनेक  सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?,” असा गंभीर आरोप सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबांवर केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी जमीन व्यवहारसंबधी कागदपत्रेही ट्विटद्वारे गाव- कोलेई, तालुका- मुरुड, जिल्हा- रायगड. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावाचे कागदपत्र दाखवून दिले आहे. “ठाकरे परिवार अन्वय नाईक यांच्या परिवार व्यावसायिक संबंध होते असं सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *