Thu. Mar 21st, 2019

अरेंज- मॅरेज मूर्खपणाच – तस्लिमा नसरिन

0Shares

अरेंज- मॅरेज हा मूर्खपणा असून हे बंद झाले पाहिजे, असे मत वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरिन यांनी व्यक्त केले आहे. लग्न हे प्रेमाच्या आधारेच केले पाहिजे आणि तरुण पिढीला त्यांच्या आवडीनुसार लग्न करण्याची मुभा दिली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या आहेत.

लेखिका तस्लिमा नसरिन यांनी आपल्या ट्विटरवर प्रेमविवाहाच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अॅरेंज- मॅरेज हा एक मूर्खपणाच असतो, हे बंद झाले पाहिजे. लग्न हे प्रेमाच्या आधारेच झाले पाहिजे.

Arranged marriage thingy is very stupid. It should not be practised anymore. Marriage should be based on love. Let couple decide whom they want to marry.

— taslima nasreen (@taslimanasreen) December 14, 2018

तसेच सर्व धर्मांमध्ये महिलाविरोधी प्रथाही बंद झाल्या पाहिजे, अशी भूमिकाही नसरीन यांनी मांडली. या प्रथांमुळे महिला अपवित्र असल्याची धारणा वाढते. त्यामुळे या प्रथा बंद होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे. तस्लिमा नसरीन या बांगलादेशी लेखिका आहेत. त्यांची ‘लज्जा’ ही कादंबरी चांगलीच वादग्रस्त ठरली. ज्यामुळे बांगलादेशने त्यांच्याविरोधात फतवा काढून त्यांना देशाबाहेर काढले. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *