Tue. Jun 28th, 2022

‘शिमग्यासाठी कोकणात जाण्यास एसटीची व्यवस्था’ – अनिल परब

राज्यात शिमग्याची लगबग सुरू झाली आहे. तर कोकणात शिमगा सण उस्ताहात साजरा केला जातो. दरवर्षी अनेक मुंबईकर शिमग्यासाठी कोकणात जात असतात. त्यामुळे यंदा शिमग्यासाठी कोकणात जाण्यासाठी खास एसटीची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

राज्यात सुरू असलेल्या एसटी संपाचा फटका अनेक कोकणवासीयांना बसत आहे. एसटी संपामुळे शिमग्यासाठी नागरिकांना कोकणात जाण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांना शिमग्यासाठी कोकणात जाता यावे, यासाठी अतिरिक्त एसटींची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

होळी आणि धुलिवंदन सणासाठी राज्य सरकारने नियमीवली जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकारचे हे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले आहेत. जर हे नियम पाळले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाण्याचा इशाराही गृह मंत्रालयाने दिला आहे.

काय आहे नियमावली?

  • रात्री दहाच्या आत होळीच दहन करावे लागणार.
  • होळी साजरी करताना डीजे लावण्यास बंदी.
  • दहावी आणि बारावीच्या परीक्षेमुळे नियमावली जारी.
  • मद्यपान करून बीभस्त वर्तन केल्यास कारवाई करणार.
  • धार्मिक भावना न दुखावण्याच्या सूचना.
  • जबरदस्तीने रंग लावण्यास मनाई.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.