#Article370 राज्यसभेपाठोपाठ लोकसभेतही जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्यासंदर्भातील विधेयक राज्यसभेपाठोपाठ लोकसभेतही मंजूर झालं. गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक लोकसभेत मांडल्यावर लोकसभेत गदारोळ झाला. त्यावर वादळी चर्चा झाली. मात्र अमित शहा यांनी विरोधकांना आक्रमकपणे प्रत्युत्तरं दिली

चर्चेनंतर जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले. आधी 351 विरुध्द 72 मतं पडली. मात्र तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा मतदान करण्यात आलं. अखेर जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक 366 विरुध्द 66 मतांनी राज्यसभेपाठोपाठ लोकसभेतही मंजूर झालं. हा एक ऐतिहासिक निर्णय ठरला आहे.

Exit mobile version