Wed. Dec 1st, 2021

#Article370 : 145 दिवसांनी कारगिलमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा पूर्ववत

कलम 370 (Article 370) हटवल्यापासून काश्मीर खोऱ्यात बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा लडाखमधील कारगिल जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. तब्बल 145 दिवसांनी इंटरनेट सेवा सुरू झाली आहे.

लडाख येथील परिस्थिती आता सामान्य झाल्यामुळे इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली.

कलम 370 हटवल्यानंतर गेल्या चार महिन्यात कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.

त्यामुळे मोबाईल इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. इंटरनेट सुविधेचा गैरवापर करू नका, असं आवाहन येथील विविध स्थानिक धार्मिक नेत्यांनी लोकांना केलं आहे.

5 ऑगस्ट 2019 पासून येथील इंटरनेट सेवा बंद होती.

कारगिलमध्ये ब्रॉडबँड (Broadband) सेवा सुरू केली होती. मात्र मोबाईल इंटरनेट सेवा अद्याप सुरू करण्यात आली नव्हती. ही सेवा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली.

कलम 370 हटवून जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) आणि लडाख असं जिल्ह्याचं विभाजन झाल्याची घोषणा 5 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. त्या दिवसापासून इंटरनेटचा वापर करून कोणतेही अनुचित प्रकार होऊ नयेत, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अखेर 145 दिवसांनी मोबाईल इंटरनेट (Mobile Internet) सुरू करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *