#Article370 : पाकिस्तान संतप्त, पण पाठींबा कुणाचाच नाही?

भारताने राज्यसभेत काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवण्याला मंजुरी दिली आहे. पाकिस्तानात भारताच्या या निर्णयाविरुद्ध मोठाच गदारोळ माजला आहे. काश्मीरवासियांच्या पाठीशी आपण उभे असल्याची बतावणी करणारा पाकिस्तान आता स्वतःच या मुद्द्यावरून इतर इस्लामिक राष्ट्रांची आणि चीनची मदत मागतोय. मात्र अद्याप या विषयावर ना चीन कोणती प्रतिक्रिया दिली, ना कोणत्या इस्लामिक राष्ट्राने. त्यामुळे पाकिस्तानच अडचणीत सापडल्याची चिन्हं दिसत आहेत.

अमेरिकेने तर थेट हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलं. तर चीननेही यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. इस्लामिक राष्ट्रांनीही यावर मौन बाळगलं आहे. यामुळे पाकिस्तानपुढे पेच निर्माण झाला आहे. एकीकडे भारत सरकार इतक्या महत्त्वपूर्ण हलचाली करत असल्याची खबर पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना का लागली नाही, असा सवाल विचारत पाकिस्तानी लेखिका आयशा सिद्दिकी यांनी पाकिस्तान सरकारला घरचा आहेर दिला आहे.

तसंच पाकिस्तानच्या संसदेतही या गोष्टीमुळे गोंधळ उडाला. जम्मू काश्मीरशी संबधीत कलम 370 हटवण्याच्या या निर्णयाचे राजकीय पडसाद पाकिस्तानमध्ये उमटले.

या विषयावर चर्चा करण्यासाठी  पाकिस्तानी संसदेचं संयुक्त अधिवेशन आज बोलावलं होत.

मात्र  संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये मोठी फूट पाहायला मिळाली.

संसदीय कामकाज मत्र्यांनी कलम 370 उल्लेख न केल्यामुळे विरोधक संतप्त झाले.

संतप्त विरोधकांनी सभागृहात जोरदार गदारोळ घातला.

गदारोळामुळे अखेरीस कामकाज तहकूब करण्यात आलं.

सभापतींच्या आश्वासनानंतरही गदारोळ कायम होता.

या नंतर संसदेबाहेर सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी भारताच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

मात्र एवढ्या महत्वाच्या क्षणी संसदेत पंतप्रधान  उपस्थित नसल्याचा निषेधही विरोधी पक्षांनी केला.

Exit mobile version